Pimpri News : वाहन योग्यता प्रमाणपत्रासाठी शनिवारी शिबिर

एमपीसी न्यूज – उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय पिंपरी चिंचवड येथे  शनिवारी (दि.11) वाहन योग्यता प्रमाणपत्रासाठी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. परिवहन संवर्गातील वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण बाबत ऑनलाईन पूर्ववेळ घेण्याचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी नियोजित तारीख घेऊन महिन्याच्या प्रत्येक शनिवारी विशेष शिबिराचे नियोजन केले जाणार आहे.

परिवहन संवर्गातील वाहन नूतनीकरणासाठी कार्यालयात मालवाहतूक लाहनांसाठी 154, टुरिस्ट टॅक्सी 34, ऑटोरिक्षा 29, तीन चाकी माल वाहतूक 6 आणि बस 23 याप्रमाणे कोटा ठरविण्यात आला आहे. वाहन धारकांनी योग्यता प्रमाणपत्र आणि वाहन तपासणीसाठी प्रत्येक शनिवारी पूर्ववेळ घेऊन वाहनासह उपस्थित रहावे असे आवाहन उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.