Pune News : माझ्यावर आरएसएसचे संस्कार, मी अंधभक्त नाही ; विक्रम गोखले यांच्यावर बोलणार नाही – अभिनेते योगेश सोमण

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्याबाबत अभिनेत्री कंगना रनौत हीने केलेल्या अक्षेपार्ह विधानाचे जेष्ठ अभिनेते यांनी विक्रम गोखले यांनी समर्थन केले होते. त्यांनतर यावर मोठा वादंग निर्माण झाला होता. दरम्यान, पुण्यात एका कार्यक्रमात अभिनेते योगेश सोमण यांनी ‘माझ्यावर आरएसएसचे संस्कार आहेत, मी अंधभक्त नाही, मी रॅशनल विचार करतो,’ असे म्हणत अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर बोलण्याचे टाळले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेत ‘फुलोरा’ काव्यसंग्रहाच्या प्रकाशन झाले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या साहित्य आघाडीच्या वतीने या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. योगेश सोमण म्हणाले, ‘परखडपणे आणि स्पष्टपणे बोलता आले पाहिजे. आपला विचार आग्रहाने मांडता आला पाहिजे. आज मी इथे विक्रम गोखलेंवर बोलणार नाही. माझ्या पाठीमागे जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संघटनेचा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार आहे. मी अंधभक्त नाही, रॅशनल विचार करतो. तो मांडतोही. एखाद्या गोष्टींमागची कारणमीमांसा करता आली पाहिजे,’ असे सोमण म्हणाले.

‘सर्वात श्रेष्ठ कलाकार मला कवी वाटतो कारण तो विश्व व्यापी कल्पना आपल्या शब्दात मांडू शकतो जी एक दैवी देणगी आहे. कला, काव्य म्हणजे जगण्याचा एक स्तोत आहे, ज्ञानेश्वरांचे पसायदान व सावरकरांचे जयोस्तुते या मराठी सारस्वताला मिळालेल्या फार मोठ्या देणग्या आहेत असे मला वाटते’, असे योगेश सोमण म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा महाजनी यांनी केले, काव्यसंग्रहाची प्रस्तावना केतकी कुलकर्णी यांनी केली, विकास अभ्यंकर यांनी आभार मानले, कार्यक्रमाचे नियोजन कमलेश जोशी, राहुल जोशी, वंदना धर्माधिकारी, शैला सोमण, सानिका खरे तसेच इतर शाखा पदाधिकाऱ्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.