Pune News : महाराष्ट्रात ‘अंनिस’वर बंदी घाला – प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज – हिंदूच्या भावनेला ठेच पोहचविणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात यावी, (Pune News) अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Alandi News :’चला एक पाऊल सिध्दबेटाकडे’ अभियानात मुख्याधिकाऱ्यांसह माजी नगरसेवकांचा सहभाग
निवेदनात प्रदीप नाईक यांनी म्हटले आहे की, ‘अंनिस’ही संस्था स्थापनेपासून हिंदू देव-देवतांना विरोध करण्याचे काम करत आहे. हिंदूच्या मंदिरांना व उत्सवांना कायम लक्ष्य केले जाते. ‘अंनिस’ ही अंधश्रद्धा नाही तर हिंदू धर्म मिटविण्याच्या मागे लागली आहे. कारण अंधश्रद्धा केवळ हिंदू धर्मात नाही तर ती इतर धर्मात देखील आहे. मात्र अंनिस कधीही कोणत्याही मौलवी किंवा फादर, पोप यांना चॅलेंज करत नाही.
आताही केवळ बागेश्वर महारांजाना जाणून-बुजून लक्ष्य केले जात आहे. हिंदू धर्म व त्यांची संस्कृती काय आहे, ती आम्हाला चांगली माहिती आहे. त्यामुळे ‘अंनिस’ने आम्हाला ती शिकवू नये, असे नाईक यांनी म्हटले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीला हिंदू विरोधी कारवाई करण्यासाठी वित्तपुरवठा केला जात आहे का, समितीचे नेमके काम काय, इतर धर्मांच्या बाबतीत जागृतता का दाखवली जात नाही, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत हिंदूंच्या भावना दुखावल्यास अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरोधात महाराष्ट्रात मोठे जनआंदोलन पुकारण्यात येईल, असा इशाराही नाईक यांनी निवेदनातून दिला आहे.