Pune News: भारतीय विद्या भवनच्या ‘भीमसेन वाणी’ला चांगला प्रतिसाद

एमपीसी न्यूज: ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ आयोजित ‘ भीमसेन वाणी ‘ या कार्यक्रमाला रविवारी सकाळी चांगला प्रतिसाद मिळाला.

भारतरत्न पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी निमित्त संगीताचार्य द.वि.काणेबुवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे करण्यात आले होते.

कार्यक्रमांत ‘ रघुनंदन पणशीकर, सौरभ नाईक,मंजुषा पाटील आणि संजय गरूड यांनी ‘भीमसेन वाणी ‘ सादर केली. प्रशांत पांडव, ओमकार दळवी, अभिषेक शिनकर, माऊली टाकळकर यांनी साथसंगत केली. भावार्थ देखणे यांनी निरूपण केले.

रघुनंदन पणशीकर यांनी ‘नामाचा गजर ‘, ‘बाजे मुरलिया ‘ या रचना सादर करून रसिकांची दिलखुलास दाद मिळवली! सौरभ नाईक यांनी पंढरी निवासा, सदा सदा मे या रचना तर संजय गरूड यांनी ‘इंद्रायणी काठी ‘, ‘माझे माहेर पंढरी ‘ तसेच ‘तीर्थ विठ्ठल ‘या भीमसेन जोशी यांच्या प्रसिद्ध, लोकप्रिय रचना आपल्या खास ढंगात सादर करून रसिकांची वाहवा मिळवली!

मंजुषा पाटील यांनी ‘भाग्यदा लक्ष्मी ‘, ‘सुखाचे हे नाम ‘ रचना सादरीकरणा बरोबरच ‘अगा वैकुंठाच्या राया ‘ ही भैरवी गाऊन कार्यक्रमाची सांगता केली!

भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले आणि सर्व सहभागी कलावंतांना काकिर्डे यांनी ज्ञानेश्वरीची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले!

हा कार्यक्रम विनामूल्य होता. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १०५ वा कार्यक्रम होता.प्रवेश कोविड विषयक सर्व प्रोटोकॉल पाळून दिला गेला .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.