Pune News : पुणे महापालिकेच्या शाळा सुरू करण्याबाबत संभ्रमावस्था !

एमपीसी न्यूज : मुंबई महापालिकेने शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात चा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांवर ढकलला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या शाळा सुरू करण्याबाबत प्रशासन आणि सत्ताधारी पक्षांमध्ये संभ्रमावस्था असल्याचे निदर्शनास आले.

23 नोव्हेंबर पासून महापालिकेच्या नववी ते बारावी इयत्तांच्या शाळा सुरू करण्याची घोषणा झाली. तत्पुर्वी शिक्षकांचे कोविड 19 पूर्वतपासणी करणे बंधनकारक केले. त्यामुळे शिक्षकांची झुंबड उडाल्यामुळे पुण्याचे आकडे वाढले.

तसेच पालकांकडून पाल्याला शाळेत पाठविण्यासाठी संमतीपत्र घेतले जात आहे. दरम्यान महापलिकेच्या शाळांमध्ये हात धुण्यासाठी साबण, हँडसॅनिटायजर आणि मास्क इत्यादी सुविधांची तयारी सुरु झाली.

शाळा सुरू करण्यासंदर्भात पुणे महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. यामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोविड 19 तपासणी अहवाल तयार केला जात आहे. आढावा घेतल्यानंतर शाळा सुरू करण्याचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे विश्वसनीय सूत्रांनी दिली.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, मुंबईतील शाळा बंद करण्याच्या निर्णयानंतर पुण्यातही याबाबत चाचपणी सुरू आहे. येत्या सोमवारी (दि.23) अंतिम निर्णय घेतला जाईल. शाळा सुरू करण्याबाबत घाईत निर्णय घेतला जाणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.