Pune News : संस्कृती राखत फझलानी आंतरराष्ट्रीय शाळेचा अनोख्या पद्धतीने बास्केटबॉल स्पर्धेत विजय

एमपीसी न्यूज – अस्पायर इंडियाच्या वतीने 12 वर्षांखालील (Pune News) मुलींची 5-अ साईड बास्केटबॉल स्पर्धा पार पडली. स्पर्धेत फझलानी आंतराष्ट्रीय प्रशालेने दणदणीत विजय मिळवला. विजयी संघाच्या खेळाडू विद्यार्थिनींनी बुरखा घालून संस्कृती जपत मैदान गाजवले.

स्पर्धेमध्ये विस्डम वर्ल्ड प्रशाला, सिटी प्राईड अ आणि ब, एल्प्रो आंतरराष्ट्रीय प्रशाला व फझलानी आंतरराष्ट्रीय प्रशाला अश्या पाच शाळांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. त्यामध्ये फझलानी आंतराष्ट्रीय प्रशालेने ही स्पर्धा फक्त जिंकलीच नाही तर एका अनोख्या पुढाकाराने जिंकली.

सर्व प्रथम विजयी शाळेच्या सर्व मुली ह्या प्रत्येक सामन्यात बुरखा घालून मैदानावर उतरल्या. स्वतःची संस्कृती जपून त्यांनी मैदानावर यश मिळवले. फक्त एवढेच नव्हे तर शाळेमध्ये वेगळे प्रशिक्षक नसून त्यांचाच सिनियर विद्यार्थांनी त्यांना बास्केटबॉल बाबत प्रशिक्षण दिले. ह्या मुलींनी एकाही सामन्यात पराभव न मिळवता ही स्पर्धा जिंकली. म्हणजे पूर्ण स्पर्धेमध्ये त्या बाकीच्या संघांवर वर्चस्व ठेवून होत्या. ह्यावरून अंतिम सामन्यामध्ये फझलानी शाळेच्या मुलींनी सर्वाना आश्चर्यचकित करून सोडले.

प्रत्येक सामन्यामध्ये सात मिनिटांचे दोन हाफ होते. भलेही सुरुवातीचे सर्व सामने ह्या (Pune News) मुलींनी एक तर्फे जिंकले असले, तरी त्या अंतिम सामन्याच्या शेवट शेवट पर्यंत 8-7 या गुणांनी फझलानी शाळा पिछाडीवर होती. परंतु, शेवटच्या 30 सेकंदांमध्ये जणू चमत्कारच घडला.

Nigdi : जेसीबीसोबत चालकही पडला नाल्यात; अग्निशमन दलाने केली चालकाची सुखरूप सुटका

8-7 च्या गुणांवरून फाझलानी शाळा ही सामना 10-8 ने जिंकल्या. शेवटच्या 30 सेकंदमध्ये त्यांनी कमबॅक केला. म्हणजे पूर्वीच्या सर्व सामन्यांमध्ये तर त्यांनी वर्चस्व व जिंकण्याची मानसिकता ही दाखवलीच, परंतु सर्वात महत्वाच्या क्षणी त्यांनी स्वतःचे मन शांत ठेवून एक ‘क्लच परफॉर्मन्स’ दिला असे म्हणू शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.