Pune News : बाणेर येथील डेडीकेटेड कोविड रुग्णालयांना तीन महिन्यांची मुदतवाढ

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पहिल्या लाटेत बाणेर येथे सुरु करण्यात आलेल्या डेडीकेटेड कोविड रुग्णालयाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या डॉ. भिसे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यांची मुदत 8 जून रोजी संपत आहे. मात्र रुग्णांची गरज लक्षात घेवून या संस्थेत तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत बाणेर येथे सुरु करण्यात आलेल्या डेडीकेटेड कोविड रुग्णालय सुरु करण्यात आले. या रुग्णालयाचा कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत रुग्णांना चांगला परिणाम झाला. या रुग्णालयाचे व्यवस्थापन डॉ. भिसे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यांना देण्यात आले आहे.

या संस्थेशी केलेल्या कराराची मुदत 8 जून रोजी संपत आहे. मात्र शहरातील रुग्णसंख्या कमी होत असली तरी भविष्यातील गरज ओळखून या व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेला तीन महिने मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायीसमोर ठेवण्यात आला होता. त्याला मंजुरी देण्यात आली. त्यासोबतच ७५ कोटी रुपयांच्या खर्चालाही मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.