Pune News : कोरोना रुग्णांकडून जादा बिल उकळणाऱ्या खाजगी रुग्णालयांकडून पालिकेने केली 4 कोटींची बिले कमी

एमपीसी न्यूज : कोरोना प्रादुर्भाव काळात अनेक खासगी रुग्णालयांनी रुग्णांची अक्षरशः लूट केली. त्यामुळेच सर्वसामान्यांची लूट होऊ नये, म्हणून पुणे महापालिकेने रुग्णांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी दीड वर्षापूर्वीच सगळ्या खाजगी हॉस्पिटल्समध्ये महापालिकेचे ऑडिटर नियुक्त केले आहे.त्यामुळे गेल्या दीड वर्षात सुमारे एक हजार रुग्णांचे तब्बल 4 कोटी रुपये बिलाच्या तपासणीतून कमी केले असल्याची बाबसमोर आला आहे.

राज्य शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच हॉस्पिटलकडून बिल आकारणी होते की नाही याबाबतची तपासणी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केली जात आहे. या तपासणी मधून गेल्या दीड वर्षात सुमारे एक हजार रुग्णांचे तब्बल 4 कोटी रुपये बिलाच्या तपासणीतून कमी करण्यात आले आहेत, तर 26 बिल भरून घरी गेलेल्या रुग्णांना सुमारे 20 लाख रुपयांचा परतावा रुग्णालयांकडून महापालिकेने मिळवून दिला आहे.

रुग्ण भरती असताना महापालिकेने एकूण 1365 रुग्णांची बिल तपासली. यातील सुमारे 1000 बिलांची रक्कम जास्त असल्याचं आढळून आली. या तपासणी करण्यात आलेल्या बिलांची एकूण रक्कम सुमारे 24 कोटी रुपये होती. तपासणी दरम्यान, सुमारे साडेचार कोटी रुपये इतकी रक्कम कमी करण्यात आली आहे. कमी केलेल्या बिलानंतर रुग्णालयात सुमारे 20 कोटी रक्कम अदा करण्यात आली. तर तपासणीच्या दुसऱ्या प्रकारात ज्याला पोस्ट ऑडिट असं म्हटलं जातं. त्यात रुग्णांच्या बिल भरल्या नंतर आलेल्या तक्रारीची आकडेवारी 222 इतकी होती.

या सगळ्या प्रकरणांची तपासणी केल्यानंतर 100 प्रकरणांमध्ये हॉस्पिटलला नोटिसा देण्यात आल्या. यापैकी 15 प्रकरणांमध्ये कागद पत्र पूर्तता नसल्याने चौकशी सुरु आहे. आलेल्या तक्रारींपैकी 89 तक्रारी बिल योग्य असल्याचं निदर्शनास आल्यानंतर निकाली काढण्यात आल्या आहेत. आणि उर्वरित 26 प्रकरणांमध्ये रुग्णालयांनी जास्त बिल आकरल्याच चौकशीत स्पष्ट झालंय.

या प्रकरणात 18 लाख रुपये रिफंड करण्यात यश मिळालंय. यात काही रुग्णांना तर 50 हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंतच्या जास्त करण्यात आलेल्या रकमेचा परतावा मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.