Pune News: जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने दुमदुमला लाल महाल

एमपीसी न्यूज: ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हर हर महादेव’, ‘जय भवानी, जय शिवाजी…,’ असा जयघोष करीत हिंदवी स्वराज्यातील प्रमुख सरदारांच्या वंशजांनी पुण्यातील लाल महाल येथे राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. सनई-चौघडे, ढोलताशा, मर्दानी खेळ, तुतारीच्या ललकारीने अवघा लाल महाल परिसर दुमदुमुन गेला होता. यावेळी विविध सरदार घराणी, मावळे, वीरमाता, रजपूत राजांचे वंशज आणि सर्वधर्मीय नागरिक उपस्थित होते.

शिवजयंती महोत्सव समितीतर्फे या शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित केला होता. सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे, समितीचे अध्यक्ष अमित गायकवाड यांच्यासह विविध मान्यवरांनी शिवरायांना अभिवादन केले.

 हरजीराजे बर्गे प्रतिष्ठानची मानवंदना

श्रीमंत हरजीराजे बर्गे प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीनिमित्त पुण्यातील लाल महाल येथील राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छ्त्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हर हर महादेव’,च्या जयघोष करण्यात आला.

प्रतिष्ठानचे सल्लागार व मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संतोष बर्गे यांच्या हस्ते लाल महाल येथील राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर एसएसपीएमएस प्रांगणातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली.

या वेळी प्रतिष्ठानचे विक्रम बर्गे, प्रणव बर्गे, विकास बर्गे, अमित बर्गे, शितल बर्गे, तेजस्वी बर्गे, गोविंद बर्गे, गुरूदत्त बर्गे, राजेंद्र बर्गे, सुनिल बर्गे, स्वप्नील बर्गे, विरेंद्र बर्गे, राजाभाऊ बर्गे, महेश बर्गे, अमोल बर्गे, नितीन बर्गे, सागर बर्गे, अतुल बर्गे, राहुल बर्गे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.