Pune News : स्थायी समितीमध्ये रखडलेला ई-कारचा प्रस्ताव आता आयुक्तांच्या मान्यतेने होणार मंजूर !

एमपीसी न्यूज – महापालिका प्रशासनाने अधिकारी व पदाधिकाऱ्यांसाठी चालकांसह ई-कार भाडेतत्त्वावर घेण्याचा ठेवलेला प्रस्ताव स्थायी समिती कडून पुढे ढकलण्यात येत आहे. या प्रस्तावामुळे महापालिकेचे वर्षाकाठी सात ते आठ कोटी रुपये वाचणार असल्याच्या महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. तर पालिकेतील पदाधिकाऱयांकडून चालकांच्या विरोधाचे कारण पुढे करत त्यास मान्यता दिली जात नसल्याने प्रस्ताव आयुक्‍तांच्या अधिकारात मान्य करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

पालिका प्रशासनाने सादर केलेल्या ई-कार भाडेतत्त्वावर घेण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या कायमस्वरूपी सेवेत असलेल्या चालकांनी विरोध केल्याचे कारण देत तो पुढे ढकलण्यात आला आहे़. स्थायी समितीने 45 दिवसांपेक्षा अधिक काळ या प्रस्तावास मान्यता दिली नसल्याने आता कायद्यातील तरतुदीचा आधार घेत आयुक्‍त आपल्या अधिकारात हा प्रस्ताव मान्य करणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

इलेक्ट्रिक कारमुळे पारंपरिक इंधन खर्चात बचत आणि पर्यावरणाची हानी कमी होणार असल्याने, केंद्र सरकारने एनर्जी इफिसिएन्सी लि. कंपनी स्थापन केली आहे़ या कंपनीने ई कार पुरविण्यासाठी महापालिकेकडे विचारणा केली होती. त्यावेळी प्रशासनाने कार विकत घेऊन चालकासह होणारा खर्च व कंपनीने ई-कार चालकासह 8 वर्षे भाडेतत्वावर पुरविल्यास होणारा खर्च याचा अभ्यास केला़ यामध्ये कार खरेदीपेक्षा चालकासह 38 ई-कार प्रायोगिक तत्वावर घेतल्यास, महापालिकेचे चालकांवरील तथा देखभाल-दुरूस्तीवरील साधारणत: वर्षाकाठी सात ते आठ कोटी रुपये वाचणार असल्याचे आढळून आले़ आहे.

यासाठी कार व चालकासह 23 कोटी 28 लाख 88 हजार रुपये खर्च येणार आहे. या कार घेतल्यास महापालिकेची महिन्याला 1 लाख 77 हजार रुपयांची बचत होणार आहे, असे प्रशासनाने प्रस्तावात नमूद केले आहे. हा प्रस्ताव प्रशासनाने जुलैमध्ये स्थायी समितीत ठेवला होता. मात्र, प्रस्तावास पदाधिकाऱ्यांकडील चालक तसेच कायमस्वरूपी चालकांनी विरोध केल्याने समितीने हा प्रस्ताव पुढे ढकलला आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.