मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Pune News: खडकवासला, पानशेत पाठोपाठ वरसगाव धरणांत 99 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज – पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे खडकवासला, पानशेत पाठोपाठ वरसगाव धरणात 99 टक्के पाणीसाठा झाला आहे. इतर दोन्ही धरणे 100 टक्के भरण्याच्या स्थितीत आहेत.

 खडकवासला 1.97 टीएमसी (100%), पानशेत 10.65 टीएमसी (100%), वरसगाव 12.73 टीएमसी (99.33%), टेमघर 3.12 टीएमसी (84.21) असा या चारही धरणांत एकूण 28.48 टीएमसी म्हणजेच 97.70% पाणीसाठा आहे. 24 ऑगस्ट 2019 रोजी 28.97 टीएमसी म्हणजेच 99.30% पाणीसाठा होता. या धरणांत आता 97 टाक्यांच्या वर पाणीसाठा झाला आहे.

खडकवासला, पानशेत नंतर वरसगाव आणि टेमघर 100 टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत. पानशेत धरणातून खडकवासला धरणात 1485 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. दिवसभरात 5136 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आला आहे.

धरणांत सध्या 28 टीएमसी पेक्षा जास्त पाणीसाठा झाल्याने पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याची काळजी दूर झाली आहे.

Latest news
Related news