Pune News : ‘प्रारंभ’ नृत्य सादरीकरणाला चांगला प्रतिसाद

एमपीसी न्यूज – भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक (Pune News) प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘प्रारंभ’ या एकल नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मधुरा कापशीकर आणि वेदश्री पुणतांबेकर या प्रेरणा देशपांडे यांच्या शिष्यांनी बहारदार सादरीकरण केले. हा कार्यक्रम शनिवार, 24 जून रोजी सायंकाळी साडे पाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह येथे संपन्न झाला.

हा कार्यक्रम विनामूल्य होता. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा 168 वा कार्यक्रम होता. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले. ईशान परांजपे, कृष्णा साळुंखे, यशवंत थिटे, शुभम खंडाळकर, कल्याणी गोखले यांनी साथसंगत केली.

वेदश्री पुणतांबेकर यांनी वंदनेनंतर सुरुवातीला तीन ताल सादर केला. त्यात उठान, थाट, बंदिशी, तिहाई, ठुमरी, तराणा यांचा समावेश होता. रसिकांनी चांगली दाद दिली.

मधुरा कापशीकर यांनी विष्णू वंदनेने सुरुवात केली. ताल झपताल दहा मात्रात सादर केला. त्यात उठान, तोडे, तिहाई, बंदिश तराणा यांचा समावेश होता. याही सादरीकरणाला भरभरून दाद मिळाली. तृषा श्रोत्री यांनी सूत्रसंचालन केले.

Alandi : आळंदीमध्ये वरुण राजाचे आगमन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.