Pune News : श्री स्वामी प्रासाद नूतन इमारतीच्या कामास शुभारंभ

एमपीसी न्यूज – मंगळवार पेठेतील श्री स्वामी प्रासाद नूतन इमारतीच्या कामास शुभारंभ झाला आहे. नव्याने होत असलेल्या या इमारतीत स्वामी भक्तांसाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

प्रताप अनंत गोगावले यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन इमारतीत स्वामी भक्तांना सुलभ दर्शन घेता येणार आहे. दर्शनासाठी रांगेत उभे राहणाऱ्या भक्तांना यामुळे ऊन, पावसापासून संरक्षण मिळणार आहे. नवीन बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे गोगावले यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.