Pune News: किंग्ज रॉयल रायडर्सचा प्रेरणा भवन सामाजिक संस्थेला मदतीचा हात

महिला दिनानिमित्त जीवनावश्यक वस्तू वाटप

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून पुण्यातील ‘रॉयल एनफील्ड मोटरसायकल क्लब किंग्ज रॉयल रायडर्स’च्या वतीने हिंजवडी येथील बौद्धिकदृष्ट्या अपंग महिलांना निवारा आणि वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या प्रेरणा भवन सामाजिक संस्थेसाठी सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सहायता मोहीम राबविण्यात आली. प्रेरणा भवन सामाजिक संस्थेत झालेल्या कार्यक्रमात महिलांना आवश्यक विविध जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.

क्लबचे प्रतिनिधी अनुप राजन, गौतम कौल, अ‍ॅड. अनंत भुकेले-पाटील यांनी क्लबचा दृष्टिकोन व उद्देश सांगितला. मोटारसायकलिंग क्लब म्हणून विरंगुळ्यासाठी देशभर फिरणे, याला आमचे प्राधान्य असले, तरी समाजातील वंचित घटकासाठी काहीतरी योगदान दिले पाहिजे. या उद्देशाने महिला दिनाचे औचित्य साधून प्रेरणा भवन संस्थेसाठी बेड, तसेच जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. क्लबच्या सदस्यांनी ऐच्छिक योगदानाद्वारे जमा केलेला निधी संस्थेच्या आवश्यकतेनुसार दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तू व किराणा सामान देण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

क्लबचे सदस्य नेहमीच विविध संस्थांतर्फे आयोजित सामाजिक बांधिलकी असलेल्या कार्यक्रमात भाग घेतात. रहदारी जागरुकता, कर्करोग जनजागृती, रक्तदान मोहीम, किल्ले जीर्णोद्धार यासारखे विविध विषय अलीकडे क्लबने हाती घेतले आहेत. भविष्यकाळात क्लब विविध संस्थांना सोबत घेऊन समाजोपयोगी अभियानांमध्ये स्वयंसेवा करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.