Pune News : कात्रज परिसरात एमएनजीएल गॅस पाईपलाईनला आग

एमपीसी न्यूज – पुण्याच्या कात्रज परिसरात असणाऱ्या एका सोसायटीत एमएनजीएलच्या गॅस पाइपलाइनला आग लागल्याचा प्रकार समोर आलाय. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुण्यातील कात्रज परिसरातील आंबेगावात टेल्को कॉलनी आहे. या कॉलनीत एमएनजीएलची पाईपलाईन आहे. मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास या पाईपलाईनला अचानक आग लागली होती. त्यानंतर स्थानिक रहिवाशांनी अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती दिली.

त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतल तीन फायर बंबाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान एमएनजीएलचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पाहणी केल्यानंतर लिकेज होऊन हा प्रकार घडला असावा असा अंदाज आहे. त्याची पाहणी करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.