Pune News : एकीकडे बेडची मारामार तर पालिकेच्या कोविड केअर सेंटर मधील 50 टक्क्याहून अधिक बेड रिकामे

एमपीसी न्यूज – शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून बाधितांना रुग्णालयात बेड मिळेनासे झाले आहेत. तर काहींना बेड अभावी प्राण गमवावे लागत आहेत. अशा परीस्थित देखील महापालिकेने उभारलेली कोविड केअर सेंटर मात्र रिकामी आहेत.

पालिकेने शहराच्या विविध भागात उभारलेल्या कोविड सेंटर मध्ये 1250 बेडची व्यवस्था करण्यात अली असून त्यातील 629 बेड रिकामे आहेत तर 621 रुग्ण येथे उपचार घेत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनाच्या पहिल्या लाटेमधे शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात कोविड सेंटर उभारण्यात अली होती. तब्बल 46 हजार कोरोना बाधित रुग्णांना इतरांपासून विलग करून बरे करण्यात यश मिळाले हाेते. मात्र, दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा फैलाव हा सोसायट्यांमध्ये आहे. त्यातील अनेकांची आर्थिक ऐपत असल्याने ते एकतर गृह विलगीकरणाचा (होम आयसोलेशन) पर्याय स्वीकारतात किंवा रुग्णालयात दाखल होतात. सध्या शहरातील 54 हजार रुग्णांपैकी 45 हजार होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यापैकी कोविड केअर सेंटरमध्ये केवळ 621 जण आहेत.

पहिल्या लाटेत प्रामुख्याने वस्त्यांमध्ये कोरोनाचा फैलाव असल्याने कोरोनाची टेस्ट केल्यावर लोक केेअर सेंटरमध्ये पाठविले जात होते. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर गंभीर नसणाऱ्यांना तेथेच ठेऊन उपचार केले जात होते. मात्र, सध्या खासगी लॅबमध्ये टेस्टींगचे प्रमाण वाढले आहे. शासकीय केंद्रातही टेस्ट केल्यावर कोणी क्वारंटाइन होत नाही. त्यामुळे रिपाेर्ट येईपर्यंत रुग्ण फिरत राहतो. सध्या 90 टक्के टेस्टींग खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.