Pune News : पुणे स्टेशनवर नव्याने बांधण्यात आलेला कंपोस्टिंग प्लांट सुरू झाला

 एमपीसी न्यूज- पर्यावरण संरक्षणात आणखी एक पाऊल पुढे टाकत, पुणे रेल्वे विभागाने पुणे रेल्वे स्टेशन परिसरात नव्याने बांधलेला कंपोस्टिंग प्लांट सुरू (Pune News)केला आहे. आयसीआयसीआय फाऊंडेशनच्या सहकार्याने आणि पर्यावरण संवर्धन संघटनेच्या (ईसीए) समन्वयाने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत हा कंपोस्टिंग प्लांट उभारण्यात आला आहे.

ज्याची सुरुवात पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे आणि ICICI फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज अग्रवाल यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.

हे संयंत्र गांडूळ प्रक्रियेद्वारे ओल्या सेंद्रिय कचऱ्यापासून उच्च दर्जाचे सेंद्रिय खत तयार करते आणि हा प्लांट दररोज 1000 किलो सेंद्रिय कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास सक्षम आहे.

Akurdi news : डुंझो अॅपकडून शीख समुदायाचा अपमान

यावेळी वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता विजयसिंह दडस, स्थानक संचालक व विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे आणि आयसीआयसीआय फाउंडेशन पश्चिम विभागाच्या प्रमुख मोनिका आचार्य, पर्यावरण संवर्धन संघटनेच्या (ईसीए) अध्यक्षा विनिता दाते यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी (Pune News)उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.