Akurdi news : डुंझो अॅपकडून शीख समुदायाचा अपमान

एमपीसी न्यूज-डुंझो अॅपने प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांचा व शीखांच्या पगडीबद्दल कागदी पिशव्यांवर स्लोगन व चित्रातून अपमान केल्याने शीख समुदायने त्या पिशव्यांचे वाटप बंद करण्याची मागणी केली (Akurdi news) आहे. तसेच अँपवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याबाबत शीख बांधवांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की डुंझो अॅप डिलिव्हरी करणाऱ्या कागदी पिशव्यांवर भारताचे महान धावपटू, ऑलिम्पिकवीर, पद्मश्री स्वर्गीय मिल्खा सिंग यांच्या नावाचा तसेच फोटोचा वाईट पद्धतीने वापर करून त्यांच्या नावाची व तमाम शीख समुदायची विटंबना केली आहे. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत. हा अपमान आम्ही सहन करणार नाही.

Pune news : पुणे चक्राकार रस्त्यांसाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग

त्यामुळे डुंझो अॅपवर त्वरित कार्यवाही करून या कागदी पिशव्या त्यांच्या सर्व आउटलेट मधून बंद करण्यात याव्यात. अन्यथा त्यांना शीख समुदयाच्या रोषास त्यांना सामोरे जावे लागेल.

याप्रकरणाबाबत मंजित सिंग म्हणाले की त्यांना परवा कळाले की डुंझो जे सामान डिलिव्हरी साठी नागरिकांना जे कागदी पिशव्या देत आहे त्यावर त्यांनी प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट ‘भाग मिल्खा भाग’ या शीर्षकावरून ‘Bag Milk-aa Bag’ असे स्लोगन लिहिले आहे. तसेच (Akurdi news) धावपटूचे जे चित्र वापरले मिल्खा सिंग पळतानाचे दाखवण्यासाठी त्यामध्ये त्याची मान व चेहरा ऐवजी बॅग दाखवली आहे. शीख समुदायत पगडीला खूप महत्व आहे पण त्यामध्ये पगडी दाखवली नाही.

Pune News : अखिल भारतीय ब्राम्हण महासंघातर्फे आढावा बैठक

यामुळे संपूर्ण शीख समुदायाचा तो अपमान आहे. यामुळे आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करत आहे. आम्ही यासाठी आकुर्डी येथे निषेध आंदोलन करणार होते पण निगडी पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन केले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.