Pune News : पुणे पालिकेच्या शाळांमध्ये घेता येणार ऑनलाइन प्रवेश, याठिकाणी करा अर्ज

एमपीसी न्यूज – राज्य शासनाने सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात दिनांक 14 जून 2021 पासून ऑनलाईन पद्धतीने करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र सध्याच्या कोविड परिस्थितीमुळे पालकांना अथवा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन प्रवेश घेणे अडचणीचे वाटत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागच्या वतीने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिकेच्या मराठी, उर्दू, इंग्रजी व कन्नड माध्यमाच्या एकूण 273 प्राथमिक शाळांसाठी पालकांना बालवाडी ते आठवी यापैकी कोणत्याही वर्गासाठी online पद्धतीने प्रवेश घेता येणार आहे. हा प्रवेश  https://rb.gy/duaxe9  या लिंकवर जावून अर्ज भरावा लागणार आहे.

कोविडमुळे निमार्ण झालेल्या परिस्थीतीमुळे शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेण्यामध्ये पालकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेवून महापालिकेने आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रणाली तयार केली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी  https://rb.gy/duaxe9  या लिंकद्वारे प्रवेश अर्ज भरावेत, असे आवाहन महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांनी ज्या शाळेची निवड केली आहे, त्या शाळेचे मुख्याध्यापक किंवा शिक्षक अर्ज भरताना विद्यार्थ्याने दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून प्रवेश निश्चित करतील. या प्रणालीमुळे पालकांना आपल्या पाल्यासाठी पालिका शाळांमध्ये मोफत प्रवेश घेता येणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले आहे.

दरम्यान, पालिकेच्या सर्व शाळांमध्ये इ-लर्निंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाणार आहे. कोविड परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून ऐपद्वारे पहिली ते आठवीचे सर्व विषयांचे शैक्षणिक व्हिडीओ इ-बुक्स, स्वाध्याय, इत्यादी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

ऑनलाईन प्रणालीवर गेल्यानंतर पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी आपण ज्या क्षेत्रीय कार्यालयाच्या (वॉर्ड ऑफिस) परिसरात राहतो, तो विभाग निवडावा. त्यानंतर ज्या क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रवेश हवा आहे, ते क्षेत्रीय कार्यालय निवडावे. पुढे संबंधित क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या शाळांची यादी दिसेल, आपणास ज्या शाळेत प्रवेश हवा आहे त्या शाळेची निवड करावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.