Pune News : पुण्यात डुकरांचा उच्छाद वाढला, ठेकेदारा अभावी 6 महिने कारवाईला ब्रेक

एमपीसी न्यूज – शहरातील ठिकठिकाणी कचर्‍याच्या ढिगार्‍याच्या आसपास डुकरांचा उच्छाद वाढला आहे. अशातच गेल्या सहा महिन्यांत ठेकेदारांची नेमणूक न झाल्याने डुक्कर कारवाईला ब्रेक लागला असल्याचे समोर आले आहे. 

उपनगरांमध्ये भटक्या डुकरांमुळे नागरिक त्रस्त आहेत. तसेच नागरिकांच्या मालमत्तोचेही नुकसान होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे वारंवार येत आहेत. तसेच नव्याने समाविष्ट गावांमध्ये पूर्वीपासूनच नागरिक डुकरांच्या उच्छादाला वैतागले आहे. त्यांना महापालिकेत आल्यानंतर डुकरांपासून मुक्ती मिळण्याची आशा वाटत होती. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून

पालिकेकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे. डुकर पकडण्यासाठी तीन वर्षांसाठी देण्यात आलेली निविदा मार्चमध्ये संपली आले.  त्यानंतर नव्या ठेकेदारासाठी पालिकेकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मात्र, त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे महापालिकेकडे कारवाई करण्यासाठी ठेकेदारच उपलब्ध नाही.

त्यामुळे शहरात, उपनगरात आणि समाविष्ट गावात डुकरांनी उच्छाद मांडला आहे. यामुळे नागरिक त्रस्त असून या मोकाट डुकरांमुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.