Pune News : महिलांच्या विविध समस्या सोडविण्याला प्राधान्यक्रम : ॲड. सुप्रिया बर्गे

एमपीसीन्यूज :  महिलांवरील अन्याय, अत्याचार, लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासह महिलांच्या विविध समस्या सोडविण्याला प्राधान्यक्रम राहील, अशी माहिती ॲड. ॲड. सुप्रिया विशाल बर्गे यांनी निवडीनंतर दिली.

महिला सुरक्षा संघटनेच्या कायदेशीर सल्लागारपदी बारामती येथील यशश्री फाऊंडेशनच्या अध्यक्षा ॲड. सुप्रिया  बर्गे यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष किसन काशिद पाटील यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे. त्यावेळी त्यांनी महिलांचे प्रश्न आणि विविध समस्या सोडविण्याचा निर्धार व्यक्त केला.

ॲड. सुप्रिया बर्गे यांनी यशश्री फाऊंडेशनच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे गरजू महिलांना कायदेशीर मदत केली. शेतीविषयक कायदे, मोटार वाहन अपघात कायदे, घरगुती हिंसाचा, शक्ती कायदा आदी अनेक कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन कार्यशाळांचे त्यांनी विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आयोजन केले आहे. लैंगिक शोषण रोखण्यासाठीही कार्यशाळा आयोजित करून बलात्कार, विनयभंग, अपहरण आणि रॅगिंगचे प्रकार रोखण्यासाठीही त्या कायम तत्पर असतात.

गुन्हेगारी रोखण्यासह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना व त्यांच्या कुटुंबियांना शिक्षण, नोकरी, व्यवसाय उपलब्ध करून देऊन आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी त्या कायम प्रयत्नशील आहेत.

आगामी काळात पदाच्या माध्यमातून संघटनेच्या ध्येयधोरणानुसार संघटना वाढीसाठी प्रयत्न केले जातील. महिलांवरील अन्याय, अत्याचार, लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासह महिलांच्या विविध समस्या सोडविण्याला प्राधान्यक्रम राहील, अशी माहिती ॲड. सुप्रिया बर्गे यांनी निवडीनंतर दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.