Pune News : पुणे पालिका, कमिन्स आणि जनवाणी यांची बालगोपाळांसाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा; नोंदणी सुरू

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका, कमिन्स इंडिया फाउंडेशन आणि जनवाणी यांच्या वतीने बालगोपाळांसाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा 2021′ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी ऑनलाईन पद्धतीने निःशुल्क अर्ज नोंदणी सुरू झाली असून 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वा. पर्यंत अर्ज करता येणार आहे. इयत्ता पहिली ते नववी या वयोगटातील स्पर्धेकांना स्पर्धेत सहभागी होता येणार असून, यांची तीन गटात विभागणी करण्यात आली आहे.

गणेशोत्सव पर्यावरणाचे भान राखून उत्सव साजरा केला पाहिजे. त्यासाठी लहानपणापासूनच मुलांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जागृती निर्माण करण्यासाठी पुणे पालिका, कमिन्स इंडिया फाउंडेशन आणि जनवाणी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा 2021’ ही प्रोत्साहनपर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्मच्या माध्यमातून आजपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

पहिली ते चौथी – पहिला गट, पाचवी ते सातवी– दुसरा गट आणि आठवी ते नववी – तिसरा गट असे तीन गट तयार करण्यात आले आहेत. उपक्रमाची माहिती आणि फोटो ऑनलाईन फॉर्मद्वारे मागविली आहे. निवडक स्पर्धकांचे प्रकल्प तपासले जाणार आहेत. सहभागी प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार असून प्रथम तीन विजेत्यांना बक्षिस दिले जाणार आहे.

निविडीसाठीचे निकष

पर्यावरणपूरक गणेश मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, पर्यावरणपूरक अगरबत्ती, शुद्ध प्रतीचे हळदी-कुंकू, पर्यावरणूरक गणेश विसर्जन, निर्माल्यापासून खतनिर्मीती, प्लास्टिक आणि ई-कच-याचे वर्गीकरण, पर्यावरणपूरक गणेशोत्सावाबाबत दहा कुटुंबामध्ये जनजागृती करणे, असे स्पर्धेतील विजेत्याच्या निविडीसाठीचे निकष आहेत.

 

नोंदणीसाठी खालील गुगल लिंकवर जा

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe2n6zcTPGqgIObI1XfjbpXToQtsPheSgcJDoPqoDnv-Cchog/viewform?usp=sf_link

 

किंवा हा क्यू आर कोड स्कॅन करावा

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.