Pune : स्वारगेट येथील घोड्याच्या शिल्पाकडे प्रशासनाचे जाणूनबुजून दुर्लक्ष – स्वराज्य पक्ष

एमपीसी न्यूज – स्वारगेट येथील घोड्याच्या (Pune) शिल्पाकडे पुणे महापालिका प्रशासनाचे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्वराज्य पक्षाचे सदस्य आशिष भोसले यांनी केला आहे.

Nikhil Wagle : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना अटक

”स्वारगेट चौक” हा पुण्यातील महत्वाचा चौक असून, एक ऐतिहासिक पेशवेकालीन ठिकाण आहे. पुणे शहराची ओळख सांगणारा सुप्रसिद्ध चौक म्हणून ख्याती आहे. पेशव्यांचे घोडेस्वार येथे वास्तव्यास असत. याची आठवण (Pune) म्हणून फ्लायओव्हर ब्रिज खाली घोड्याचे एक सुंदर लोखंडी शिल्प आहे. खाली घोडेस्वारांचे प्रतिक म्हणून लोखंडी बूट आहेत. परंतु, या सुंदर शिल्पाची, गंज चढूनसध्या दुर्दशा झाली आहे. शिल्पकाराच्या, या सुंदर कलाकृतीला वाचवणे आवश्यक आहे. यासाठी पुणे मनपा प्रशासन, लोकप्रतिनिधींनी अवश्य लक्ष घालावे, अशी मागणीही भोसले यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.