Nikhil Wagle : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना अटक

एमपीसी न्यूज : ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagle) यांच्या कारवर हल्ला केल्याप्रकरणी पर्वती पोलिसांकडून दहा आरोपीना अटक करण्यात आली आहे. हे आरोपी भाजप आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस (अजित पवार गट) यांचे कार्यकर्ते असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Pune : औंध येथे पैशाच्या वादातून एकावर गोळीबार; तर हल्लेखोराने स्वत:वर गोळ्या झाडून केली आत्महत्या

यामध्ये दिपक पोटे, गणेश घोष, गणेश शेरला, बापु मानकर, स्वप्नील नाईक, प्रतीक देसरडा, दुशांत मोहोळ, दत्ता सागरे, गिरीश मानकर आणि राहुल पायगुडे यांना अटक करण्यात आली आहे.

तसेच, निखिल वागळे यांनी सोशल मिडियावर शेअर केलेल्या पोस्टनुसार, सभेत सहभागी झालेल्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.