Sangvi Crime News : सासरी येऊन पत्नीला मारहाण; जावई अटकेत

एमपीसी न्यूज – पत्नी माहेरी गेल्यानंतर तिच्या माहेरी जाऊन जावयाने पत्नीला बेदम मारहाण केली. तसेच तिच्यावर ब्लेडने ओरखडले. याप्रकरणी जावयाच्या विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 30) दुपारी विनायकनगर, पिंपळे निलख येथे घडली.

दादा लक्ष्मण ससाणे (वय 40, रा. वाटलुज, ता. दौंड) असे अटक केलेल्या जावयाचे नाव आहे. याबाबत विद्या दादा ससाणे (वय 30)  यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विद्या आणि आरोपी दादा हे पती-पत्नी आहेत. विद्या मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्या माहेरी पिंपळे निलख येथे आल्या होत्या. सोमवारी आरोपी दादा देखील पत्नीच्या माहेरी पिंपळे निलख येथे आला. तू आपल्या घरी चल, असे म्हणत त्याने विद्या यांच्यासोबत भांडण केले. विद्या यांनी पतीसोबत जाण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने आरोपीने विद्या यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच ब्लेडने फिर्यादी यांच्या मानेजवळ ओरखडले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. एच. येडे तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.