Pune : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निविदा राबविण्याची प्रशासनाची घाई

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Pune ) पार्श्वभूमीवर पुणे महापालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपयांच्या निविदा राबविण्याची घाई सुरू केली आहे. नगरसेवकांच्या दबावामुळे मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर निविदा काढाव्या लागत असल्याचा दावा करणाऱ्या महापालिकेने आर्थिक वर्ष संपुष्टात येत असताना आणि लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या शक्यतेने 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी या दोन दिवसांच्या कालावधीत किमान 150 कोटींच्या 138 निविदा काढल्या आहेत. महापालिकेच्या विविध विभागांनी या निविदा काढल्या असून, 10 लाखांपासून कोट्यवधी रुपयांपर्यंतची कामे यामध्ये प्रस्तावित करण्यात आली आहेत.

अंदाजपत्रकातील कामे पूर्ण करण्यासाठी वर्षभराचा कालावधी असतानाही आर्थिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्याने त्याबाबत शंका उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.

महापालिका प्रशासनाकडून अंदाजपत्रकात कोट्यवधी रुपयांची कामे प्रस्तावित केली जातात. या कामांसाठी विभागनिहाय आर्थिक तरतूद उपलब्ध करून दिली जाते. नव्या आर्थिक वर्षाच्या एक एप्रिलपासून अंदाजपत्रकाची अंमलबजावणी सुरू होते. कामांसाठी तरतूद असल्याने ही कामे मुदतीमध्ये पूर्ण करणे अपेक्षित असते. मात्र महापालिका प्रशासनाने यंदा शेवटच्या टप्प्यात निविदा काढण्याचा विक्रम केला आहे.

Pune : पुणे लोकसभेसाठी मनसेचे पाच उमेदवार, अमित ठाकरेंनी वडिलांकडे सोपवली यादी

लोकसभा निवडणूक एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.  (Pune ) त्याची आचारसंहिता मार्च महिन्याच्या मध्यापासून लागेल, असा प्रशासकीय अंदाज आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी 25 फेब्रुवारीपर्यंत निविदाप्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश खातेप्रमुखांना दिला आहे. त्यानुसार उद्यान, पाणीपुरवठा, मलनि:सारण, पथ, विद्युत विभागाबरोबरच सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून लहान-मोठ्या कामांच्या निविदा काढण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार गेल्या दोन दिवसांत सुमारे दीडशे कोटींच्या 138 निविदा काढण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी मनपा प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.