Pune News : सोसायट्यांतील रहिवाशांचा ओढा सरळीकरणाला विरोध

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या माध्यमातून आंबील ओढा सरळीकरण विषय सध्या गाजत आहे. पण हा विषय खूप गंभीर असून ओढा सरळ केल्याने २१४ दांडेकर पूल, १३० दांडेकर पूल झोपडपट्टी, ९९९ दत्तवाडी, १२८ हनुमान नगर, फाळके प्लॉट दत्तवाडी, १००४/०५ राजेंद्र नगर झोपडपट्टी व विवेक श्री सोसायटी, श्यामसुंदर गोकुळ वृंदावन सोसायटी, फाटक बाग, आनंद बाग हा सर्व भाग पाण्याखाली शंभर टक्के जाऊन जीवित व वित्त हानी होऊ शकते.

आंबील ओढ्याचा इतिहास पाहता 2019 – 2020 च्या दरम्यान महापूर घटनेने महाराष्ट्र हादरवला होता. दांडेकर पूल भागापासून पुढचा भाग हा उताराचा असून सखल आहे. म्हणून स्थानिक रहिवाशांनी विरोध केला आहे. यासंबधीचे पत्र आंबिल ओढा बचाव कृती समितीने पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांना दिले.

आंबिल ओढा या ४०० वर्षे जुन्या जलप्रवाहाचा मार्ग बदलण्याचा घाट घातला आहे, अशी तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे. आंबिल ओढ्याचे बांधकाम हे राजमाता जिजाऊ यांनी पुणेकरांना शेती व पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी केले होते. सदर आंबील ओढा सरळ केला तर याचे दुष्परिणाम सर्वे नंबर दांडेकर पूल झोपडपट्टी, ९९९ दत्तवाडी झोपडपट्टी व त्याला लागून असलेले हनुमान नगर झोपडपट्टी, फाळके प्लॉट, १००४ राजेंद्र नगर झोपडपट्टी, १००५ विवेकश्री सोसायटी, इतर बाजूच्या सोसायटी आणि रहिवासी यांना पुराचा धोका जाणवू शकतो. पाण्याचा जोराचा प्रवाह खालील भागात आल्यास मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होऊ शकते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.