Pune News : एअर मार्शल संजीव कपूर एनडीएच्या प्रमुखपदी

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) प्रमुखपदी एअर मार्शल संजीव कपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कपूर यांनी आज (रविवार, दि.31) लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री यांच्याकडून पदभार स्वीकारला. असित मिस्त्री सैन्यदलात 39 वर्षे सेवा बजावून आज निवृत्त झाले.

एअर मार्शल कपूर हे एनडीएच्या 67 व्या तुकडीतील माजी प्रशिक्षणार्थी आहेत. तसेच फ्लाइंग इन्स्ट्रक्टर स्कूल, डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. तर 1985 मध्ये ते भारतीय हवाईदलात रुजू झाले.

आपल्या आतापर्यंतच्या कार्यकाळात त्यांनी विविध विमानाद्वारे सात हजार 800 तासांहून अधिक मुक्त उड्डाण केले आहे. त्यांनी संरक्षण अभ्यासात एम.एस्सी, मॅनेजमेंट स्टडीजमध्ये पदव्युत्तर पदवी आणि एम.फील केले आहे. त्याचबरोबर सध्या ते उस्मानिया विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.