Pune News : टाटा स्टीलकडून सारस डायलिसिस सेंटरला 2.75 लाखांचे साहित्य भेट

एमपीसी न्यूज – टाटा स्टील डाऊनस्ट्रीम प्रॉडक्ट्सच्या वतीने लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग चॅरीटेबल ट्रस्टतर्फे चालवण्यात येणाऱ्या सारस डायलिसिस सेंटरला दोन लाख 75 हजारांचे डायलिसिस साहित्य भेट देण्यात आले. आज (रविवारी, दि.07) दुपारी हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी टाटा स्टील डाऊनस्ट्रीम प्रॉडक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक अब्राहम स्टेफनोस, सरव्यवस्थापक वेंकट पामपटवार, लायन्स क्लब ऑफ पुना चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन फतेचंद रांका, लायन्स क्लबचे अध्यक्ष संतोष पटवा, सचिव कल्पेश पटणी, कन्व्हेनर तुषार मेहता, माजी सदस्य योगेश शहा, उत्कर्ष गांधी, राजेंद्र शहा, प्रविण ओसवाल, आशा ओसवाल, आशुतोष गुप्ता, पन्ना मेहता आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अब्राहम म्हणाले की, टाटा ग्रुप नेहमीच समाजहिताचे कार्य करण्यासाठी अग्रस्थानी असतो. गरजू लोकांसाठी डायलेसिस सेंटर चालवण्याचा हा खूप स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमाला आम्हाला मदत करता आली याचा मला आनंद वाटतो.

सरव्यवस्थापक वेंकट पामपटवार यांनी क्लबसोबत कायमचे नाते जोडले गेल्याच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी टाटा ग्रुपच्या सहकाऱ्यांनी रुग्णांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली. संस्थेचे अध्यक्ष एस. पटवा यांनी स्वागत केले, तर आशा ओसवाल यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.