Pune News : काश्मिरातून ताब्यात घेतलेल्या ‘त्या’ संशयित दहशतवाद्याला 14 जूनपर्यंत कोठडी

एमपीसी न्यूज –  पुण्यातील दापोडी परिसरातून दहशतवाद विरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी “लष्कर ए तय्यबा”शी या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या मोहम्मद जुनेद मोहम्मद अता (वय २८) याला अटक केली होती. आता जम्मू – काश्मीरमधून त्याचा साथीदार आफताब हुसेन शाह याला देखील अटक केली आहे. सध्या तो 14 दिवसांच्या एटीएस कोठडीत आहे. 

दरम्यान अटक केलेल्या मोहम्मद जुनेद मोहम्मद अता याने तब्बल १५ फेसबुक खाती वेगवेगळ्या नावाने काढली होती. तर, त्याची सात व्हॉट्सअप ग्रुप देखील असल्याचे तपासात समोर आले. त्यासाठी त्याने वेगवेगळ्या क्रमांकाचा वापर केला आहे. त्याचा आणखी तपास करायचा आहे. तो भारतातील आणखी काही जणांच्या संपर्कात असल्याची माहिती एटीएसकडून न्यायालयात देण्यात आली. जुनैदच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने ७ जूनपर्यंत वाढ केली आहे.

 

पोलीस कोठडची मुदत संपल्याने पुणे एटीएसने मोहम्मद जुनैदला शुक्रवारी न्यायालयात हजर केले. त्याला दहा दिवसांपुर्वी (दि. २४ मे) अटक केली होती. एटीएसने त्याच्याकडे गेल्या दहा दिवसांपासून तपास केला. तपासात जुनैदच्या संपर्कातील जम्मू-काश्मीरमधील आफताब हुसेन शाह (वय २८, रा. किस्तवाड प्रांत, जम्मू-काश्मिर) याला अटक केली आहे. आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत.

 

मोहम्मद जुनैद याच्या घरातून पोलीसांना काही कपडे मिळाले आहेत. त्यावरून ते कपडे प्रशिक्षणासाठी वापरल्याची शक्यता वर्तविली आहे. ते कपडे कोठून घेतले किंवा कोणाकडून शिवून घेतले. तसेच, त्याने भारतातील तसेच महाराष्ट्रातील काहीजणांशी संपर्क केलेला आहे, त्यादृष्टीने एटीएसकडून तपास केला जात आहे. तसेच, व्हॉट्सअपग्रुपमधील सदस्य यांना निष्पन्नकरून त्यांच्याकडे तपास सुरू केला आहे. अटक केलेला आफताब शहा आणि जुनैद यांच्याकडे एकत्रित तपास करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.