Pune News : वारजेमध्ये सापडलेल्या बिबट्याला ताम्हिणी घाटात सोडणार!

एमपीसी न्यूज : पुण्यातील वारजे भागातील अहिरे (Pune News) गावात दोन वर्षीय बिबट्याला तब्बल दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद करण्यात यश आले. त्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्याला काही वेळातच ताम्हिणी घाट परिसरातील जंगलात सोडले जाणार आहे. तसेच, हा बिबट्या एनडीएमधून अन्नाच्या शोधात मानवी वस्तीमध्ये आला असावा, अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाळ यांनी दिली.

पुण्यातील वारजे भागातील अहिरे गावात आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे एका बाजूला घटनास्थळी बघ्याची गर्दी, तर दुसर्‍या बाजूला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांची रेस्क्यू टीम काही मिनिटात दाखल झाली.

Pune : वारुळवाडी पाणीपुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण करावे – पालकमंत्री

त्यानंतर त्या टीमने घटनास्थळी चारही बाजूने जाळी आणि योग्य नियोजन करत तब्बल दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. त्यानंतरच त्या बिबट्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. त्या बिबटय़ाची तब्येत चांगली असून त्याचे वय अंदाजे 2 वर्ष असण्याची शक्यता आहे. तसेच, त्याला (Pune News) ताम्हिणी घाटात सोडण्यात येणार असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.