Pune News : ज्येष्ठ महिलेच्या मनाची श्रीमंती; रिक्षा प्रवासादरम्यान मिळालेले पैशाचे पाकीट परत केले

एमपीसी न्यूज – रिक्षाने प्रवास करत असताना (Pune News) एका साठ वर्षीय महिलेला सापडलेले पैशाने भरलेले पाकीट या महिलेने परत केले. मिळालेले पैशाचे पाकीट घेऊन त्या पोलीस चौकीत गेल्या. त्यानंतर पाकिटात असणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याला हे पाकीट परत देण्यात आले. निलाबाई झुंबर शिंदे (वय 60) असे या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास निलाबाई पिंगळे वस्ती ते मुंढवा या दरम्यान रिक्षाने प्रवास करत होत्या. यावेळी रिक्षात त्यांना तांबड्या रंगाचे लेदरचे पॉकिट सापडले. यावेळी त्यांनी रिक्षा चालक अशोक हजारे यांच्यासह मुंढवा पोलीस चौकीत धाव घेऊन हे पाकीट पोलीस हवालदार खाडे यांच्याकडे दिले.

 या पॉकेटमध्ये रोख रक्कम 7,110/-रुपये व अनिल मलमल पटियात यांचे नावाचे असणारे ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुक, पॅन कार्ड, हेल्थ कार्ड, एटीएम कार्ड, अशा वस्तू होत्या. त्यानंतर आरसी बुक वर असणाऱ्या मोबाईल क्रमांकावर फोन करून संबंधित व्यक्तीला मुंढवा पोलीस चौकीत बोलावले. आणि खात्री करून हे पॉकेट त्यांना परत केले.
 रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे मिळाल्यानंतर पॉकेटधारक व्यक्तींनी रिक्षा (Pune News) चालकाचे या महिलेचे आणि पोलिसांचे विशेष आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.