Pune News : क्रिकेट प्रशिक्षक चव्हाण, पॉवरलिफ्टर मनीष कोड्रा यांचा महावितरणच्या वतीने गौरव

एमपीसी न्यूज – क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणारे व महावितरणमध्ये कार्यरत अजय चव्हाण व मनीष कोड्रा यांचा मुख्य अभियंता  सचिन तालेवार यांच्याहस्ते गुरुवारी (दि.28) रास्तापेठ येथील प्रशासकीय कार्यालयात सत्कार करण्यात आला.

यावेळी अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, प्रकाश राऊत, कार्यकारी अभियंता माणिक राठोड, किशोर सोनपरोते, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर उपस्थित होते.

महावितरणच्या रास्तापेठ विभागाचे सहायक लेखापाल अजय चव्हाण यांची 19 वर्षाखालील महाराष्ट्र किक्रेट संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. दिल्ली व अहमदाबाद येथे नुकत्याच झालेल्या विनू मंकड क्रिकेट चषक स्पर्धेत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र संघाने 15 वर्षांनंतर थेट अंतिम फेरीत धडक दिली व स्पर्धेचे उपविजेतेपद मिळविले.

तसेच, रास्तापेठ चाचणी विभागाचे तांत्रिक कर्मचारी मनीष कोड्रा यांनी औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या पॉवरलिफ्टींग स्पर्धेत 74 किलो वजनगटात बेंचप्रेस प्रकारात 142.5 किलो वजन उचलून विजेतेपद पटकाविले. महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टींग असोशिएशनने ही स्पर्धा आयोजित केली होती. या दोघांचेही मुख्य अभियंता सचिन तालेवार यांच्यासह उपस्थितांनी कौतुक करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.