Dudulgaon News: शरदचंद्र पवार महाविद्यालयामध्ये लसीकरण मोहीम

एमपीसी न्यूज – आळंदी डुडुळगाव येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पिंपरी -चिंचवड महापालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन युवा स्वास्थ covid-19 लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत 67 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मयूर ढमाले यांनी मार्गदर्शन केले.

महाविद्यालयातील या मोहिमेचे संयोजन विद्यार्थी विकास मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना या दोन विभागाच्या वतीने करण्यात आले होते. प्रा.शाहूराज येवते. डॉ.रणजीत कदम आणि महाविद्यालयाचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सहकारी सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.