Pune News: मित्रमंडळ चौकातील पूल वाहतुकीसाठी खुला न केल्यास अधिकाऱ्यांचे तोंडाला काळे फासणार : राष्ट्रवादी

एमपीसी न्यूज: ​पर्वती मित्रमंडळ चौकाजवळील आंबिल ओढ्यावरील पुल लवकरात लवकर वाहतुकीस खुला करण्यात यावा,नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी येत्या महिनाभरात तो चालु करण्यात यावा,नाही तर राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टीच्या वतीने अधिकाऱ्यांना काळे फासण्यात येईल,हे कार्याध्यक्ष दिलीप अरुंदेकर यांनी इशारा दिला

यावेळी नगरसेवक सुभाष जगताप म्हणाले पुलाच्या कामाची निविदेची ६ महिने मुदत असुन हि सदर पुलाचे काम ९ महिन्यापेक्षा जास्त काळ लोटुन गेला तरी पुर्ण झाले नाही,प्रशासन हे ​धीम्मपणे काम करत असुन नागरिकांची होणारी गैरसोय त्यामुळे होत आहे तरी प्रशासनाची कृती किती लाजीरवाणी आहे.

पर्वती विधानसभा अध्यक्ष संतोष नांगरे म्हणाले पुणे महानगरपालिकेच्या महत्तवाची पदे भुषविणारे लोकप्रतिनिधी या प्रभागातील असुन हि सदर पुलाचे काम वर्षभर रखडले आहे,तरी भाजपाचे लोकप्रतिनिधी आपले काम चोखपणे करीत नाहीत, त्यामुळे नागरिकांना अशा त्रासाला नाहक सामोरे जावे लागत आहे.नगरसेविका प्रियाताई गदादे म्हणाल्या जनता वसाहतील घरेलु कामगार,विद्यार्थी,नागरिक यांची खुप रेलचेल या रस्त्यावर असते त्यामुळे त्या सर्वांची मोठी गैरसोय होत आहे.यावेळी महिला शहराध्यक्ष मृणालिनी वाणी,श्वेता होनराव,गणेश मोहिते,सुशांत ढमढेरे,प्रेमराज गदादे,अभिजीत उंद्रे,मिलींद कडभाने,राहुल गुंड,संग्राम होनराव,संतोष पिसाळ,निलेश पवार,प्रमोद कोठावळे,प्रशांत क्षीरसागर,नारायण तेलंग,फारुख शेख,मोहसीन काझी,महेंद्र गावडे,सुशिल कचरे,योगेश पवार,सोनाली उजागरे,प्राजक्ता जाधव,रुपाली बिबवे,विश्वास ननावरे,अजित बाठे आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.