Night School: रात्र प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

एमपीसी न्यूज : पूना नाईट हायस्कूल व श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्सच्या 102 व्या वर्धापनदिनी (Night School) इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

 

प्रशालेतील विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक मा. महेश पालकर प्रमुख पाहुणे म्हणून तर शाला समिती अध्यक्ष मा. अविनाश नाईक व प्राचार्य सतीश वाघमारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरस्वती मंदिर संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. विनायक आंबेकर यांनी केले.

 

Vadgaon Maval : आगामी निवडणुकांमध्ये तालुक्यात भाजपचाच झेंडा – बाळा भेगडे

 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. पालकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये जर आत्मविश्वास व या आत्मविश्वासाच्या जोडीला पडेल ते काम करण्याची जिद्द व चिकाटी अंगी असेल तर आयुष्यात तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. (Night School) याच्या जोरावर तुम्ही नक्कीच यशाला गवसणी घालू शकाल असा आत्मविश्वास त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण केला.

 

यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रात्र प्रशालेचे कामकाज दर्शविणारी चित्रफीत उपस्थितांना दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुबाळकर यांनी केले तर आभार प्राचार्य वाघमारे यांनी मानले.(Night school) या कार्यक्रमाचे संयोजन रात्र प्रशालेच्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.