Crime News : लग्न मोडल्याच्या रागातून महिलेची इनस्टाग्रामवर बदनामी

एमपीसी न्यूज – सोशल नेटवर्कींग आता केवळ ओळख वाढविण्याचे माध्यम राहिले नसून, आता गुन्हेगार त्याचा वापर ब्लॅकमेल करण्यासाठीही करत आहेत. लग्न मोडले म्हणून एकाने इन्स्टाग्रामवरून निगडी येथील महिलेची बदनामी केली आहे.

 

निगडी पोलिसात पिडीतेने तक्रार दिल्यानंतर कुणाल सिंग (रा. मुंबई)  याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व आरोपी यांची ओळख शादी डॉटकॉमवर झाली. सुरुवातीची बोलणी झाल्यानंतर लग्न जुळवण्यासाठी तयारी सुरु झाली. मात्र दोघांची कुंडली जुळली नाही म्हणून लग्नाची बोलणी थांबली. तशी फिर्यादी यांनीही बोलणे थांबवले. पुणे आरेपीने रागाने त्यांच्याकडे शरिर सुखाची मागणी केली, जी की फिर्यादी महिलेने नाकारली. याचा राग आल्याने त्याने फिर्यादी यांची इनस्टावरून त्यांच्या ओळखीच्या माणसात व मित्रमंडळीत बदनामी करण्यास सुरुवात केली. हा प्रकार मार्च ते जुलै 2022 असा तीन महिने सुरु होता. अखेर पिडीत महिलेने पोलिसात धाव घेत आरोपी विरोधात तक्रार दिली.यावरून चिखली पोलीस पुढिल तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.