Pune : पुण्यात पुन्हा एकदा भावी खासदार म्हणून काॅंग्रेस नेत्याचे बॅनर लागले

काॅंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचे प्लेक्स पुण्याच्या मध्यवर्ती भागात

एमपीसी न्यूज – खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर ( Pune)  पुणे लोकसभेची जागा रिक्त झालीय . त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. काँग्रेसतर्फे आमदार रविंद्र धंगेकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी यांच्या नावाची चर्चा आहे.

Alandi : जलप्रदूषणामुळे इंद्रायणी पुन्हा फेसाळलेली

याच पार्श्वभूमीवर भावी खासदार म्हणून पुण्यात पुन्हा एकदा काॅंग्रेस नेत्याचे बॅनर लागले आहेत. पुणे शहाराचे काॅंग्रेसचे शहाराध्यक्ष अरविंद शिंदे यांचे प्लेक्स पुण्याच्या मध्यवर्ती भागात लागले आहेत. याआधी भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक, मनसेचे नेते वसंत मोरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांचेही भावी खासदार म्हणून बॅनर्स लागले होते. भाजप पाठोपाठ पुणे लोकसभा हा काॅंग्रेसचाही बालेकिल्ला राहिला आहे. यासाठी आता काॅंग्रेसचे वरिष्ठ आणि केंद्रातील नेते पुणे दौरा करणार ( Pune) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.