Alandi : जलप्रदूषणामुळे इंद्रायणी पुन्हा फेसाळलेली

एमपीसी न्यूज – स्थळ प्रमुख तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये , एकीकडे सिद्धबेट बंधाऱ्यावरील ( Alandi ) नदीपात्रात पुनश्च जलपर्णी चे आगमन त्यापासून तेथील जलचर प्राण्यास जीवास धोका होत आहे तर त्या बंधाऱ्यातून नदीकाठच्या गावांचे  मैलामिश्रित पाणी तसेच कारखानाचे कोणतीही प्रक्रिया न केलेले रासायनिक मैला मिश्रित काळसर रंगाचे पाणी नदीपात्रात पडत आहे. ते पाणी पडल्या नंतर पांढरा शुभ्र फेस निर्माण होऊन नदीपात्रातील पाण्यावर तरंगत आहे.

तेथील नदीपत्रातील ते पाणी वाहत वाहत खाली (गरुड स्तंभ, भक्त पुंडलिंक मंदिर) येत आहे.इंद्रायणी मातेचे पवित्र पाणी म्हणून काही भाविक ते पाणी प्राशन करतात तर काही स्नान करताना दिसून येतात. व काही भाविक इंद्रायणी मातेची आरती करताना दिसून येतात.अशी सद्यस्थितीची परिस्थिती दिसून येत आहे.

Pimpri : ठाकरे गटाच्या मावळ लोकसभा संघटकपदी संजोग वाघेरे

या मैल मिश्रित पाण्यात स्नान केल्याने त्वचारोगाची शक्यता तर आहेच ते पाणी प्राशन केल्याने पोटाचे व इतर आजारांची शक्यता आहे. हे पाणी पशु पक्षी पिल्यास त्यांच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. या अशुद्ध पाण्याने नदी काठच्या कुपनलिकेच्या पाण्यावर परिणाम होतो.ते पिण्यास अयोग्य होते.

तसेच जलचर(मासे ) प्राण्यांवर परिणाम होऊन त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना ही दिसून येतात. जलप्रदूषण मुक्तीसाठी विविध संस्था कार्य करत आहेत, स्थानिक आमदारांनी सुध्दा या जलप्रदूषण  संदर्भात प्रश्न उपस्थित केले, इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी मंत्री शुद्ध उपाय ,योजना व प्रकल्प

याबद्दल माहिती देताना दिसून येत आहेत.

परंतु सद्यस्थितीत इंद्रायणी नदी वारंवार जलप्रदूषणामुळे फेसाळलेली दिसून येत आहे. यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करत आहे?असा स्थानिक नागरिक सवाल करत आहे. जलप्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ते करत ( Alandi ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.