Pune : द एस क्लबच्या वतीने क्रिकेट लीग चे आयोजन

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील (Pune)व्यापाऱ्यांना एकत्र घेऊन स्थापन करण्यात आलेल्या द एस क्लब (The ACE Club) च्या वतीने क्रिकेट लीग चे आयोजन करण्यात आले आहे .

द एस क्लबच्या वतीने नेहमीच विविध कार्यक्रमांचे (Pune)आयोजन केले जाते, त्या पैकी सर्वांच्याच आवडीचा क्रीडा प्रकार म्हणजे क्रिकेट. त्यामुळे गेली दहा वर्षे क्लब कडून एस क्रिकेट लीग चे आयोजन करण्यात येते.

Pimpri : मोबाईल हेच तरुणाई समोर आव्हान- राहुल गिरी

ज्यामध्ये पुरुष आणि महिला सभासद उत्साहाने सहभागी होतात. आज पुना क्लब च्या मैदानावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते क्रिकेट लीग चे उद्घाटन करण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक रघुनाथ अण्णा गौडा, क्लब चे संस्थापक उद्योजक नरेश मित्तल, लीग चे चेअरमन अमित गुप्ता, एस क्लब चे अध्यक्ष दिलीप गुप्ता आणि लीग चे सचिव आनंद मित्तल उपस्थित होते.

84 पुरुष तर 39 महिला या चार दिवसीय क्रिकेट लीग मधे सहभागी झाले आहेत. विजयी संघास चषक तर प्रत्येक सहभागी खेळाडूस विजयचिन्ह देण्यात येणार आहे. अमन किया रायडर्स, मीरा ह्युंदाई युनायटेड, लिनीआ वॉरियर्स, सत्यम रायझर्स, एलिट स्ट्रायकर्स,महाफास्ट चॅम्प्स, के – लाइन लेडी फाल्कन्स आणि एटी ॲव्हेंजर्स या संघांनी आपल्या दमदार प्रदर्शनाने स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.