Pune : बालगंधर्व कलादालनमध्ये मंगळवारपासून ‘बाळकडू 2’ व्यंगचित्र प्रदर्शन

एमपीसी न्यूज – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या (Pune) वतीने बालगंधर्व कलादालनमध्ये मंगळवारपासून ‘बाळकडू 2’ व्यंगचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

बालगंधर्व कलादालन येथे या व्यंगचित्रांचे प्रदर्शन दिनांक 16 ते 18 जानेवारी रोजी होणार असून याचे आयोजन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे शहर प्रसिद्धी प्रमुख अंनत घरत यांनी केले आहे. याचे उद्घाटन दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी 11 वा. शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या हस्ते होणार असून यावेळी शिवसेना पक्ष आणि महाविकास आघाडीतील शहर प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

Pimpri : मोबाईल हेच तरुणाई समोर आव्हान- राहुल गिरी

शिवसेना पक्षात झालेली घडामोड, पक्ष फुटी आणि एकंदरीत शिवसेना आणि सत्तेसाठी लालची झालेल्या राजकारण्यांचे व्यंगचित्र “बाळकडू 2” या राजकीय आणि सामाजिक व्यंगचित्र प्रदर्शनातून व्यक्त करण्यात येत आहे. “बाळकडू 2” व्यंगचित्र प्रदर्शन हा महाराष्ट्रात मागील वर्षात राजकीय उलथापालथीवर कुंचल्याच्या माध्यमातून ओढलेला आसूड असून व्यंगचित्रकार अमित पापळ यांनी ही  (Pune) व्यंगचित्र रेखाटली आहेत.

https://www.youtube.com/watch?v=yiL5tv7B0bU

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.