Pune : सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त मुक्त संवादाचे आयोजन

एमपीसी न्यूज – सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त पुणे येथे ( Pune)  शनिवारी (दि. 1) मुक्त संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सनातन संस्थेची 25 वर्षे म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक सेवेची 25 वर्षे आहेत. सनातनचे साधक आणि शुभचिंतक यांच्या समर्पणाची 25 वर्षे आहेत, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस यांनी येथे केले.

सनातन संस्था ही आध्यात्मिक संस्था असून तिचे सर्व उपक्रम समाजाचे आध्यात्मिक कल्याण साध्य करणारे आहेत. ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’, ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’, ‘व्यसनमुक्तीसाठी अध्यात्म’, ‘व्यक्तीमत्त्व विकासासाठी अध्यात्म’ आदी विषयांवरील प्रवचने, अध्यात्माचे अभ्यासवर्ग, साधना सत्संग, बालसंस्कारवर्ग आदी माध्यमांतून संस्था समाजाभिमुख कार्य करत आहे.

Ravet : भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

चेतन राजहंस यांनी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा परिचय आणि सनातन संस्थेच्या स्थापनेचा उद्देश विस्ताराने सांगितला. त्यानंतर पत्रकारांनी संस्थेचे उपक्रम, उद्देश, विचार आदी विषयांवरील प्रश्नांचे शंकानिरसन करून घेतले. नास्तिकतावाद्यांच्या हत्यांच्या प्रकरणात सनातन संस्थेचे नाव गोवण्यात आल्याच्या संदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन सनातन संस्थेचे साधक चैतन्य तागडे यांनी ( Pune) केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.