Pune : सूर्य किरण एरोबॉटिक टीमची चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिके

एमपीसी न्यूज – भारतीय वायू सेनेच्या सूर्य किरण एरोबॉटिक टीम (SKAT) च्या वतीने आज, शनिवारी लोहगाव विमानतळावर चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. सूर्य किरण एरोबॉटिक टीम (SKAT) च्या वैमानिकांनी केलेल्या प्रात्यक्षिकांनी प्रेक्षकांना अक्षरशः श्वास रोखून धरायला लावले.

_MPC_DIR_MPU_II

या कार्यक्रमाला पुणे शहरातील मान्यवर, हवाईदल आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी तसेच आसपासच्या शाळेतील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सूर्य किरण एरोबटिक टीमने उपस्थितांशी संवाद साधला. या चित्तथरारक प्रात्यक्षिकांमुळे उपस्थित नव्या पिढीच्या मनात भारतीय वायुसेनेबद्दल आकर्षण निर्माण झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.