Devendra Fadnavis : आमचे सरकार वेगाने निर्णय घेणार- देवेंद्र फडणवीस

ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर टीका

एमपीसी न्यूज-आमचे सरकार वेगाने निर्णय घेणारे असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना (Devendra Fadnavis) सुनावले.आगामी महापालिका निवडणुक डोळ्यासमोर शिंदे फडणवीस सरकारने मुंबईतील झोपडपट्टी धारकांना अडीच लाखात घर देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी टीका विरोधक करीत  आहे, त्याचे उत्तर देताना ते बोलत होते.

 देवेंद्र फडणवीस म्हणाले , मी राज्याचा मुख्यमंत्री होतो.त्यावेळी झोपडपट्टी धारकांसाठी कायदा केला.त्याबाबत दर निश्चित करायचे होते.पण त्यावेळी माझे मुख्यमंत्रीपद गेले. त्यानंतर आलेल्या सरकारमध्ये अडीच वर्ष मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे होते.

Sangvi : केक फेकून दिल्याने पतीवर चावीने वार 

राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे पूर्णपणे मंत्रिमंडळ होते .त्यावेळी त्यांना संधी होती. मात्र त्यावेळी त्यांनी ठरवले नाही.त्यानंतर पुन्हा आमचे सरकार आले आणि आम्ही ठरविले.त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीचा काय संबध आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते  म्हणाले की, तुम्हाला जे अडीच वर्षात ठरवता आले नाही.ते आम्ही आमचे सरकार आल्यावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी निर्णय घेतला.आमचे सरकार वेगाने निर्णय घेणारे असल्याचे सांगत ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना (Devendra Fadnavis) सुनावले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.