Updated News : केक फेकून दिल्याने पतीवर चावीने वार; परस्पर विरोधात गुन्हे दाखल 

एमपीसी न्यूज – पत्नीने लग्नाच्या वाढदिवसासाठी आणलेला केक पतीने फेकून (Updated News) दिला. त्यावरून पत्नीने पतीवर गाडीच्या चावीने वार केले. ही घटना मंगळवारी (दि. 23) औंध हॉस्पिटल कर्मचारी क्वार्टर येथे घडली. याच्या परस्पर विरोधात पत्नीने तिला मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे.
राहुल गौतम धेंडे (वय 40, रा. औंध हॉस्पिटल कर्मचारी क्वार्टर, औंध) असे जखमी पतीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पत्नी विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल यांची पत्नी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त केक घेऊन आली. दरम्यान तिने घरगुती कारणावरून फिर्यादी सोबत वाद घातला. फिर्यादी शिवीगाळ केली. दरम्यान फिर्यादी यांनी गाडीवर ठेवलेला केक फेकून दिला. त्यावरून फिर्यादी यांच्या पत्नीने फिर्यादीवर वार करून त्यांना जखमी केले.
याच्या परस्पर विरोधात तीस वर्षीय पत्नीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .त्यानुसार पती राहुल धेंडे आणि दीर भूषण धेंडे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिला आणि त्यांच्या पतीमध्ये असलेल्या वादामुळे फिर्यादी त्यांच्या माहेरी राहतात. मंगळवारी फिर्यादी त्यांच्या लग्नाचा सोळावा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक घेऊन सासरी आल्या. त्यावेळी पती आणि दिराने त्यांच्यासोबत वाद घालून त्यांना मारहाण केली. यामध्ये फिर्यादी जखमी झाल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत (Updated News) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.