Pune : कारच्या धडकेने पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कात्रज बाह्यवळण मार्गावर कारच्या (Pune ) धडकेने पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ललिता विजय बोरा (वय 65 , रा. आंबेगाव बुद्रुक) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी चालक अनिरुद्ध खैरनार (रा. डोंबिवली, जि. ठाणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी अविनाश रेवे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chinchwad : चिंचवड गावातील गणपती मंदिराची तोडफोड

बोरा या कात्रज चौक ते नवले पूल दरम्यान असलेल्या बाह्यवळण मार्गावरुन निघाल्या होत्या. आंबेगाव बुद्रुक परिसरात त्या रस्ता ओलांडत होत्या.

त्यावेळी भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या बोरा यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक मोहन देशमुख तपास करत (Pune ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.