Pune : अखिल भारतीय व्हिडिओ फोटो प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद .

एमपीसी न्यूज- कॅवॉक सर्विसेसतर्फे पुण्यात स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे ‘पुणे फोटो फेयर 2018’ या पाचव्या आखिल भारतीय विडिओ फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. छायाचित्र आणि छायाचित्रण या विषयाशी निगडीत या प्रदर्शना मध्ये पुणे, मुंबई बरोबरच महाराष्ट्रातील कोल्हापुर, सांगली, रत्नागिरी, सोलापूर, बार्शी, नाशिक तसेच गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, चेन्नई, बंगळूरु, केरळ इत्यादी ठिकाणचे छायाचित्रकार तसेच छायाचित्रण क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी झाले होते. या प्रदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रातील छायाचित्रकार संघांचाही सहभाग होता.

देशी विदेशी ७० हून अधिक कंपन्यांनाची फोटोग्राफी व छायाचित्रण विषयीची सर्व साहित्यसामुग्री या प्रदर्शनामध्ये पहावयास मिळाली. फोटो व विडिओ कॅमेरा, फोटो एडिटिंग चे सॉफ्टवेअर व हार्डवेअर, इंस्टन्ट फोटो प्रिंटर, वीडियो मिक्सर, जिमिजीप, क्रेन्स, कॉपटर्स, ट्रायपॉड्स अशा किती तरी आधुनिक प्रणालीं चा समावेश असलेल्या सामुग्री इथे उपलब्ध होत्या. पुण्यातील एका कम्पनी ने बनवलेला यंत्र मानव हे या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरला.

प्रदर्शनाच्या ठिकाणी ‘मॉडेल फोटो शूट’, बेसिक छायाचित्रण तसेच अत्याधुनिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेर्‍याचा वापर, हाताळणी या विषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. तसेच चित्रिकरणाची अत्याधुनिक सामुग्री वापराविषयी प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. हौशी आणि फोटो व व्हिडिओग्राफी या व्यवसायात येऊ पाहणाऱ्या युवकांना या उपक्रमाचा लाभ झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.