Chikhali : परिसरात दहशत पसरवत व्यावसायिकावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – परिसरात दहशत पसरवत व्यावसायीकावर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. ही घटना सोमवारी (दि.29) दुपारी दीडच्या सुमारास चिखली येथे घडली.

अरविंद ओगडभाई चौधरी (वय 32, रा.कृष्णानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार विजय सुनील कुंजीर (रा. चिखली) याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चिखलीमध्ये पंकज स्टील नावाचे दुकान आहे. ते दुपारी दुकानाजवळ उभे असताना कुंजीर तेथे आला व त्याने ‘या भागातला भाई मी आहे. बघु तुला आता माझ्यापासून कोण वाचवतय’ असे म्हणत चौधरी यांच्या डाव्या हातावर व डाव्या कानावर कोयत्याने वार केले. तसेच त्याने हातातील कोयता हवेत फिरवत परिसरात दहशत पसरवली. भर दिवसा कायत्याने वार झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण होते. आरोपीला अद्याप अटक झाली नाही. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.