Pune Police : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाठवले पुणे पोलिसांच्या बनावट सह्यांचे पत्र; गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Pune Police) आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलिस कर्मचार्‍यांच्या बनावट सह्यांचे पत्र पाठवल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहर पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

याप्रकरणी तुकाराम नाळे यांनी गुरुवारी बंडगार्डन पोलिस ठाण्यात प्राथमिक माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नळे हे अतिरिक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांचे ‘रीडर’ म्हणून काम करतात, त्यांची नुकतीच पुणे शहर पोलिसांत बदली झाली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री कार्यालय आणि फडणवीस यांच्या कार्यालयाला चव्हाण यांच्या बदलीचे पत्र आले होते.

चव्हाण यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर असलेल्या या पत्रावर पुणे शहर (Pune Police) पोलिसातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि काही उपनिरीक्षकांच्या बनावट सह्या होत्या. राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाने केलेल्या चौकशीत या पोलीस अधिकार्‍यांनी असे कोणतेही पत्र पाठवले नसून त्यांच्या सह्या बनावट असल्याचे उघड झाले आहे. पत्र पाठविणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime : हडपसरमध्ये कारचे सायलेन्सर चोरणाऱ्या टोळीला अटक, दहा सायलेन्सर जप्त

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.