Today’s Horoscope 17 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 17 December 2022 
वार – शनिवार.
17.12.2022
शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
आज विशेष- धनुर्मासारंभ.
राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – उत्तरा फाल्गुनी 9.18 पर्यंत नंतर हस्त.
चंद्र राशी – कन्या.
—————————————-
मेष (शुभ रंग – पिस्ता)
तुमची काही जुनी दुखणी डोके वर काढण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ मंडळींना आज काही आरोग्य विषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत हमखास यश मिळेल.

वृषभ (शुभ रंग – मोतिया)
आज उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण राहील. स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. गृहिणी आज पार्लर साठी आवर्जून वेळ काढतील. आज संध्याकाळी सहकुटुंब चैन कराल.

मिथुन (शुभ रंग – सोनेरी)
धंद्यातील येणी वसूल होतील. कार्यक्षेत्रात आज स्वतःचे महत्त्व सिद्ध करू शकाल. गोड बोलून आपला स्वार्थ साधून घेण्याची कला तुम्हाला चांगलीच जमेल.

कर्क (शुभ रंग – राखाडी)
आज तुमचे मन काहीसे चंचल राहील घाई गर्दीत काही चुकीचे निर्णय घ्याल. आज प्रवासात काही नव्हे हितसंबंध जुळून येतील. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल.

सिंह (शुभ रंग – चंदेरी)
आज तुमची आवक मनाजोगती असली तरीही बचतीस प्राधान्य देणे आवश्यक आहे कठोर बोलण्याने काही सांगली नाती दुरावतील क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांशी मतभेदाची शक्यता आहे.

कन्या (शुभ रंग – स्ट्रॉबेरी) – Today’s Horoscope 17 December 2022 
आज तुमची तब्येत काहीशी नरमच असेल. मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल. क्षुल्लक गोष्ट फार मनाला लावून घेऊ नका. आज जशास तसे या धोरणाने वागा.

तूळ (शुभ रंग – पांढरा)
आज तुम्हाला काही अत्यावश्यक देणी चुकवावी लागतील. रात्रीच्या प्रवासात आपले मौल्यवान ऐवज सांभाळा. अति स्पष्ट बोलण्याने नाती दुरावतील. आज क्षणिक मोहात अडकू नका.

वृश्चिक (शुभ रंग – भगवा)
आज तुम्ही जसे चिंताल तसे होईल. तुमच्यासाठी आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा असून तुमची काही अपुरी स्वप्न साकार होतील. व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. छान दिवस आहे.

धनु (शुभ रंग – निळा)
उद्योगधंद्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून नोकरीत तुम्हाला वरिष्ठांचा पाठिंबा राहील. अधिकार योग चालून येतील. हाताखालच्या लोकांवर तुमचा वचक राहील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.

मकर (शुभ रंग – मोरपंखी)
आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नांत वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्या. वाहतुकीचे नियम मोडू नका, दंड चुकणार नाही.

कुंभ (शुभ रंग – क्रीम)
नवीन ओळखीत लगेच विश्वास टाकू नका. आज जिवलग मित्रही दगा देतील. कार्यक्षेत्रातही सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. गाडी चालवताना धाडस नको.

मीन (शुभ रंग – आकाशी)
व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी तुम्ही सज्ज असाल. वादविवादात आपलीच मते इतरांवर लादू शकाल. आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी राहील.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Pune Police : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाठवले पुणे पोलिसांच्या बनावट सह्यांचे पत्र; गुन्हा दाखल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.